सहस्त्रार चक्र

मुख्यपृष्ठ | सहस्त्रार चक्र

देवता: श्रीमाताजी
स्थूल स्वरूप: मेंदूतील लिंबिक भाग
गुण: सामूहिक चेतना, एकात्मता, शांती, जाणिवेची निर्विचारीता
पाकळ्यांची संख्या: १०००
संबंधित दिवस: सोमवार
संबंधित रंग: विविध रंग
संबंधित ग्रह: प्लुटो
संबंधित खडा: मोती
हातावरील स्थान: तळहाताचा मधला भाग
दोषांची कारणे:
नास्तिकता, श्रीमाताजीवर श्रद्धा नसणे, ईश्वराविरोधी कार्य

प्रास्ताविक

सहस्रारात सर्व यंत्रणा एकात्म झा लेली असते. प्रत्येक चक्राचे याठिकाणी स्थान असते.

गुण

सहस्त्राराच्या स्थानात आपण सापेक्षतेच्या पलीकडे जातो. तिन्ही गुणांच्यावर जातो. कुंडलीनीने सहस्त्रारात प्रवेश केला की चक्रांच्या पाकळ्या उघडतात आणि प्रकाशमानता घटित होते. टाळूच्या भागात स्पंदन जाणवते आणि टाळूच्या भागातून थंड लहरी वाहू लागतात. कुंडलिनी जशी आपल्या वैयक्तिक चेतनेला वैश्विक चेतनेशी (आत्म्याला परमात्म्याशी) जोडते, तसे आपण वैश्विक चैतन्य लहरींशी संलग्न होतो.(ज्या चैतन्य लहरींनी सर्व विश्व व्यापलेले आहे.)चैतन्य लहरींचे सौंदर्य व गहनता यांच्यातून दुस-या व्यक्तीचे आकलन करण्याची क्षमता आपण विकसित करू शकतो. निसर्गातील सौंदर्य, कलाकृतींचे सौंदर्य चैतन्य लहरींच्या स्वरूपात प्रकट होऊ लागतात. प्रश्न विचारताच थंड चैतन्य लहरींच्या रूपाने सकारात्मक उत्तर वाहू लागते.

देवता

सहजयोग महायोग आहे आणि तो श्री माताजी आपल्याला देतात. त्यांच्या कृपेने आपली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन आत्मा प्रकाशमान होतो आणि चैतन्य लहरींची जाणीव होते. शिवाय आपल्या जागृती नंतर आपण दुसऱ्यांची कुंडलिनी जागृत करू शकतो. त्यांना आत्मसाक्षात्कार देऊ शकतो. ईश्वरी प्रेमाचा संदेश जगभर पसरवू शकतो. श्रीमाताजींनी याचे असे वर्णन केले आहे, की,ईश्वरी साक्षात्कार घेण्याची मेंदूची मर्यादित क्षमता, अमर्यादित होते. तुम्ही आणि तुमचे जेव्हा वेगळेपण असते तेव्हा आसक्ती असते. त्या वेगळेपणाच्या भावनेतून आपण आसक्त होतो. जर आपणच प्रत्येक गोष्ट आहोत तर आपल्या शिवाय दुसरे कोण असणार? मेंदूची स्वतःच्या वेगळ्या अस्तित्वाची भावना (आयडेंटिटी) संपली की तथाकथित मर्यादित मेंदू अमर्यादित आत्मा होतो'.

सहस्त्रार चक्राची स्वच्छता

प्रार्थना

  • श्री माताजी कृपा करून मला आत्मसाक्षात्कार द्या.
  • श्री माताजी आपल्या परम कृपेने माझा आत्मसाक्षात्कार दृढ होऊ दे, प्रस्थापित होऊ दे.

सामान्य सूचना

  • एक हात श्री माताजींच्या फोटोचे बाजूस उघडून दुसऱ्या हाताच्या तळव्याचा मध्यभाग टाळूवर हलका दाब देऊन, तो हात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावा,एकीकडे हृदयापासून प्रार्थना करावी.
  • हाताने हलका दाब देत, डोक्याची त्वचा पुढे-मागे हलवावी. त्यात हलकेपणा येईपर्यंत ही कृती सावकाश करावी.
  • हातांना कपाचा आकार देऊन हलक्या हाताने डोक्याच्या दोन्ही बाजूंना मालिश करावे.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058