सहजयोगाचे प्राथमिक तंत्र

मुख्यपृष्ठ | सहजयोगाचे प्राथमिक तंत्र

कुंडलिनी चढवणे

डावा हात आपल्या खालच्या पोटा समोर, तळवा पोटाच्या बाजूस करून धरावा. मग तो हात सावकाश वर उचलत डोक्याच्या वरच्या बाजूस न्यावा. डावा हात उचलला जात असताना उजवा हात त्या हाताचे भोवती वर्तुळाकार/ घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे फिरवावा. (डाव्या हाताच्या मागच्या बाजूस उजव्या हाताच्या तळव्याची बाजू धरून तसाच तो खाली, पुढचे बाजूस व वरचे बाजूस फिरवत आणावा). अशा पद्धतीने दोन्ही हात मस्तकाचे वर आणावेत व टाळूचे वरचे बाजूस गाठ मारतांना करतात, तशा हाताच्या हालचाली करून एक गाठ मारावी. ही कृती तीन वेळा करावी. दुसऱ्या वेळी दोन गाठी व तिसऱ्या वेळी तीन गाठी माराव्यात.

बंधन

डावा हात मांडीवर उघडा, तळवा वरचे बाजूस करून ठेवावा. उजवा हात आपल्या डाव्या बाजूस आसनापर्यंत खाली न्यावा. मग उजवा हात सावकाश डाव्या बाजूने वर उचलून आपल्या मस्तकावरून आपल्या उजव्या बाजूस आसनापर्यंत खाली आणावा. मग तसाच उजव्या बाजूस वर उचलून मस्तकावरून डाव्या बाजूस आसनापर्यंत खाली आणावा. हे एक बंधन पूर्ण झाले. ही क्रिया सात वेळा करून सात बंधने घ्यायची असतात. हि बन्धने घेणे म्हणजे आपण आपल्या भोवती चैतन्याचे कवच तयर करणे.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058