विशुद्धी चक्र

मुख्यपृष्ठ | विशुद्धी चक्र

मध्य विशुद्धी
देवता: श्रीकृष्ण
स्थूल स्वरूप: सर्व्हायकल प्लेक्सस (थायरॉईड)
नियंत्रण: हात, मान, तोंड, जीभ, नाक,दात, चेहरा
गुण: ईश्वरी चातुर्य (डिव्हाईन डिप्लोमसी), 
सामूहिक चेतना, आनंदी, खेळकरपणा, 
साक्षी स्वरूपत्व, अनासक्ती
पाकळ्यांची संख्या: सोळा
संबंधित दिवस: शनिवार
संबंधित रंग: निळा /करडा( ग्रे)
संबंधित ग्रह: शनि
संबंधित तत्त्व: आकाश
संबंधित खडा: सफायर
हातावरील स्थान: तर्जनी
दोषांची कारणेः
सामूहिकतेमध्ये नसणे, साक्षी स्वरूप नसणे, 
आसक्ती आसणे, आत्मसन्मान नसणे.

डावी विशुद्धी 
देवता: श्रीविष्णुमाया, श्रीकृष्ण
कार्य: भाऊ-बहिणीचे संबंध, आत्मसन्मान, आत्मविश्वास
हातावरील स्थान: डाव्या हाताची तर्जनी
दोषांची कारणे
अपराधीपणा, अनैतिकता, उपरोधिक बोलणे

उजवी विशुद्धी
देवता: श्री विठ्ठल रुक्मिणी
कार्य: आत्म्याचा साक्षीभाव, आनंद
हातावरील स्थान: उजव्या हाताची तर्जनी
दोषांची कारणे
चिकित्सकपणा, कठोर भाषा

प्रास्ताविक

माणसाचा सामूहिकतेत रमणारा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाशी जे काही संबंधित आहे ते सर्व विशुद्धी चक्रामुळे माणसाला मिळालेले आहे. त्याचप्रमाणे क्षुद्र भेदभावांच्या पलीकडे जाऊन सामूहिकतेच्या स्पिरीटचा किंवा आत्म्याचा अनुभव घेण्याची क्षमताही प्रकाशित विशुद्धी चक्रामुळे येते.

गुण

चक्र प्रकाशित असेल, तर अनासक्ततेची जाणीव मिळते की ज्याच्यामुळे आधुनिक जीवनात जगण्याच्या खेळाकडे तटस्थपणे पाहता येते. या खेळाचे साक्षी होऊन भावनिक गुंतवणूक व विचार नियोजन व सवयी, तसेच इमोशन्स (भावना) इत्यादींपासून आपण दूर राहू शकतो. तसेच सामूहिकतेचे उपरोक्त सर्व गुण आपल्यामध्ये येतात. त्याच्यामुळे सर्वांशी आपले संबंध सद्भावनापूर्ण होतात.आपला आत्मसन्मान तसेच इतरांबद्दलची आदराची भावना त्याचप्रमाणे बोलण्यातून वागण्यातून इतरांशी येणारा संपर्क व चातुर्य या सर्वांवर विशुद्धी चक्राच्या अवस्थेचा परिणाम होतो. अपराधीपणाची भावना डाव्या विशुद्धी चक्रात खोलवर गेल्याने आत्मसन्मानाचा अभाव दिसतो. आत्मसाक्षात्कारानंतर आपला मानसिक कमकुवतपणा जाणवून तो काढण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.

हंसा चक्र

हंसा चक्र हे विशुद्धी चक्राचा भाग असून याचे स्थान दोन्ही डोळ्यांच्या मधोमध असते.
पूर्वसंकेत (इंट्यूशन्स) व निर्णय क्षमता यांचा हंसा चक्राशी संबंध असतो.

देवता

श्रीकृष्ण या चक्राची अधिष्ठात्री देवता आहेत. त्यांनी जीवनाकडे किंबहुना विश्वातील घटनांकडे अनासक्तपणे लीला नाट्य म्हणून पाहिले व लीला नाट्यात जे जे जुलमी व अधार्मिक होते त्यांचा संहार केला. ईश्वरी चातुर्य ,पूर्वसंकेत व योग्य ती कृती वेळेनुसार करणे इत्यादी आदर्श होते. त्यांच्यामुळे ते गोकुळात राहिले, द्वारकेचा राजा झाले व अर्जुनाचे सारथीही झाले.
या चक्राच्या डाव्या अंगावर (डावी विशुद्धी) श्रीकृष्णाच्या आधी जन्मलेल्या श्रीविष्णुमाया यांचे वास्तव्य आहे तर उजव्या विशुद्धी चक्रावर श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे आहे.

स्थूल शारीरिक कार्य

या चक्रामुळे गळा, हात, चेहरा तोंड, दात इत्यादी सांभाळले जाते. हे चक्र सशक्त ठेवण्यास थंडीपासून संरक्षण करणे तसेच तंबाखू व घसा खराब करणारे पदार्थ वर्ज्य करणे आवश्यक आहे. तसेच इतरांशी संपर्कात असताना आपल्या बोलण्याने कुणाचाही अनादर होत नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. चैतन्य लहरींच्या संवेदना व जाणीव यांच्यासाठी विशुद्धी चक्र अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण तळहातावर संवेदना दर्शवणाऱ्या नसा विशुद्धी चक्राशी जोडलेल्या असतात.
आपला आवाज व बोलणे अयोग्य होणार नाही याबद्दल जागरूक राहून टीका करण्याऐवजी स्तुती करणे व आदर दर्शविणे तसेच बाष्कळपणा, अपशब्द वगैरे टाळणे अशी काळजी घेण्याचा उजव्या विशुद्धी चक्रास फायदा होतो.हृदयापासून बोलण्याकडे लक्ष असावे.

विशुद्धी चक्राची स्वच्छता

मध्य विशुद्धी चक्राची स्वच्छता

तत्त्वांचा उपयोग

 • विशुद्धीच्या भागाभोवती मेणबत्तीचा उपयोग करणे जास्त परिणामकारक ठरते.

प्रार्थना

 • श्री माताजी, आपल्या कृपाशीर्वादाने मला सामूहिकतेचा घटक बनवा.

सामान्य सूचना

 • गळ्याचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फ किंवा त्यासारख्या गोष्टींचा उपयोग करा. नेहमी जेवणापूर्वी हात धुणे अतिशय महत्त्वाचे आहे.
 • विशुद्धीसाठी मीठ हे खूप चांगले आहे. मीठ घातलेल्या कोमट पाण्याने सकाळी व रात्री गुळण्या कराव्या.
 • मान, खांदे, नाक यांना ऑलिव्ह तेलाने (किंवा कोणत्याही व्हिटँमीनयुक्त तेलाने) मालिश करावे.
 • आठवड्यातून एकदा झोपण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल किंवा बदाम तेलाने मालिश करावे व दुसऱ्या दिवशी सकाळी धुवावे.
 • नाकात साजूक तुपाचे थेंब सोडणे फार परिणामकारक उपाय आहे.

डाव्या विशुद्धी चक्राची स्वच्छता

तत्वांचा उपयोग

 • विशुद्धीच्या भागाभोवती मेणबत्तीचा उपयोग करणे.

प्रार्थना

 • श्री माताजी , कोणत्याही गोष्टींसाठी मला अपराधी वाटत नाही. मी निर्दोष आहे.

सामान्य सूचना

 • विशुद्धी चक्रास व्हायब्रेशन्स देणे.
 • मानेला व्हायब्रेशन्सचा उपयोग करून मसाज करणे.
 • उपरोधिक, अपमानकारक बोलणे टाळावे तसेच स्वतःला आनंदी ठेवावे.
 • बंधू-भगिनी नात्यात पावित्र्य ठेवा.
 • स्वतःबद्दल जास्त बोलू नका .
 • खांद्याची अनावश्यक हालचाल करणे टाळावे.

उजव्या विशुद्धी चक्राची स्वच्छता

तत्त्वांचा उपयोग

 • वायू तत्त्वाचा उपयोग करणे.

सामान्य सूचना

 • उजव्या विशुद्धी चक्रास व्हायब्रेशन्स देणे.
 • इतरांशी कठोर भाषेत बोलू नये. नेहमी मधुर बोलावे.
 • अति बोलणे, वाद घालणे टाळावे.
 • हंसा चक्राची स्वच्छता.

तत्त्वाचा उपयोग

 • हंसा चक्राभोवती मेणबत्तीचा उपयोग करणे जास्त परिणामकारक ठरते.

सामान्य सूचना

 • वितळवलेल्या तुपाचे दोन थेंब नाकात टाकून घशापर्यंत नेणे.
 • पूर्णपणे कोरड्या अन्नापेक्षा थोडा रस असलेल्या अन्नाचा उपयोग खाण्यासाठी करा.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058