मूलाधार चक्र

मुख्यपृष्ठ | मूलाधार चक्र

देवता: श्रीगणेश
स्थूल स्वरूप: पेल्विक प्लेक्सस, प्रोस्टेट ग्रंथी (पुरुषात)
कार्य: उत्सर्जन व प्रजनन संस्थांच्या कार्याचे नियंत्रण
गुण: अबोधिता ,सुज्ञता , पावित्र्य, चीर बालकत्व
पाकळ्यांची संख्या: चार
संबंधित दिवस: मंगळवार
संबंधित रंग: लाल प्रवाळ
संबंधित ग्रह: मंगळ
संबंधित तत्त्व: पृथ्वी (कार्बन)
संबंधित खडा: पोवळे
हातावरील स्थान: हाताच्या तळव्याचा मनगटाला लागून असलेला भाग
दोषांची कारणे
डावी बाजू: अनैतिकता, तांत्रिक , गूढ विद्या
उजवी बाजू: वागण्यात अतिरेकी शुद्धता

प्रास्ताविक

उत्क्रांतीच्या आरंभी अमिबा हे एक पेशीय प्राणी निर्माण झाले. पुढे त्यांची अधिक गुंतागुंतीची रचना होत जाऊन ते अनेक पेशीय जीवात व शेवटी माणसात विकसित झाले. मूलाधार चक्र पृथ्वीतत्त्वाचे घडले असून, हे चक्र सूक्ष्म यंत्रणेचा मूळ आधार आहे. कुंडलिनीच्या स्थानाच्या (माकड हाड - मूलाधार) खालच्या बाजूस याचे स्थान आहे आणि जागृत झालेल्या कुंडलिनीच्या उत्थानाला मूलाधार चक्र आधार देते म्हणून याला हे नाव आहे. जागृत व सशक्त मूलाधारचक्रामुळे माणसात आपोआप दिशांचे भान विकसित होते. कारण जागृत व सशक्त मूलाधार चक्रामुळे माणसात एक प्रकारची चुंबकीय शक्ती जागृत होते.

गुण

निरागसता आणि अबोधिता हा या चक्राचा मूलभूत गुण आहे. प्रत्येक सदाचारी स्वभावाच्या व्यक्तीमध्ये मुख्यत्वे हा गुण कार्यरत असतो. लहान मुलात विशेष दिसून येतो. मोठ्या माणसांनी निरपेक्षतेने केलेल्या कार्यात हा गुण असतो. निरागसपणा बरोबर लहान मुलांची अंगभूत सुज्ञता पण असते. लहान बाळाला अनेक गोष्टी नैसर्गिकरीत्या आतूनच समजतात. त्रास असल्यास ते रडून दर्शवतात, भूक लागल्यास अंगठा चोखून ते दाखवतात. मुलातील सुज्ञता बिघडवली गेली नाही, तर मोठेपणी त्या व्यक्तीच्या अगदी संतुलित प्रायॉरिटीज (प्राथमिकता )असतील.म्हणजे कशाला जास्त प्राधान्य द्यायचे, कशाला कमी, कोणत्या गोष्टी टाळायच्या वगैरे योग्य प्राधान्यक्रम त्याला आपोआपच समजेल. परंतु समाजाच्या प्रभावामुळे ही निरागसता, काही वेळा दूषित होते आणि त्याबरोबरची सुज्ञता दबली जाते. सहजयोग ध्यानाने मूलाधार चक्राचे गुण जागृत करून आपण जास्त निरागस व्यक्ती होऊ शकतो.

देवता

श्रीगणेश मूलाधार चक्राचे अधिष्ठात्री देव आहेत. त्यांचे स्वरूप अतिशय निरागस आहे आणि त्यांच्या दर्शनाने निरागसता मिळू शकते. ते गौरी स्वरूप कुंडलिनीचे जागरुकतेने व उत्साहाने रक्षण करतात. जागृत होऊन केव्हा उत्थापित व्हायचे याची कुंडलिनीला श्रीगणेशच सूचना देतात. त्यापूर्वी कुंडलिनी उठत नाही. म्हणून मूलाधार चक्रातील दोष जाऊन ते स्वच्छ झाल्यावर व श्री गणेश जागृत झाल्यावर कुंडलिनी शक्ती वरच्या चक्रांमधून प्रवास करू लागते. प्रत्येक चक्र पार करण्यापूर्वी श्री गणेशच कुंडलिनीला सूचना देतात. या दृष्टीनेही श्रीगणेश प्रथम पूजित आहेत. श्री गणेशांची सुज्ञता ह्रदयातून येते आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या बोलण्याचा खरा अर्थ, समजण्याची क्षमता मिळते. लहान मुले पुष्कळदा, त्यांना येणाऱ्या सूक्ष्म संवेदने प्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त करतात हे आपण पाहिले असेलच. श्री गणेश हे चिरंतन बालक असल्याने त्यांना लहान मुलांचा स्वाभाविक खेळकरपणा ,उत्साह आणि प्रेम यांची आवड आहे.

स्थूल शारीरिक कार्य

मूलाधार चक्रामुळे उत्सर्जन व प्रजनन संस्थांच्या कार्याचे नियंत्रण होते. आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर स्वतःच्या व दुसऱ्यांच्या पावित्र्याबद्दल आदर व सन्मान विकसित करायला आपण शिकतो. ही सदाचरणाबद्दलची जाणीव आपल्यातील गुरुत्व आणि शक्ती यांच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे.

मूलाधार चक्राची स्वच्छता

अशक्त मूलाधार चक्रामुळे दिशांचे भान, स्मृती आणि शारीरिक समतोल यांच्यावर परिणाम होतो. इतरही शारीरिक व मानसिक आजार सदोष मूलाधार चक्रामुळे होऊ शकतात.

तत्त्वांचा उपयोग

  • शक्य तेव्हा जमिनीवर बसावे.
  • डावा हात श्री माताजींच्या फोटोच्या बाजूस, मेणबत्तीच्या ज्योतीच्या जवळ धरून उजवा हात जमिनीवर ठेवावा (खुर्चीवर बसल्यास, जमिनीचे बाजूस खालच्या दिशेने सोडावा.)
  • उजव्या मूलाधारचक्राच्या स्वच्छतेसाठी डावा हात जमिनीवर ठेवावा. मीठ घातलेल्या पाण्यात पाय ठेवून बसण्याने मूलाधार चक्रास फायदा होऊ शकतो.

प्रार्थना

  • श्री माताजी कृपा करून मला निरागस करा (अथवा निरागसता द्या)
  • श्री माताजी, आपल्या परम कृपेने माझे मूलाधार चक्र स्वच्छ व्हावे.

श्रीमाताजींचा उपदेश

  • चित्त वेधून घेणाऱ्या स्थूल व भौतिक गोष्टींच्या ऐवजी जमीन, आकाश ,हिरवे गवत वगैरे नैसर्गिक गोष्टींवर शक्य तेवढे चित्त ठेवावे.
  • पती अथवा पत्नी सोडून इतरांशी बंधू-भगिनी असे संबंध ठेवावे.
  • निरागसता विकसित करण्यास त्यासंबंधी सद्गुण कसे आत्मसात करता येतील, इकडे लक्ष द्यावे.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058