मीठपाणी उपचारपद्धती

मुख्यपृष्ठ | मीठपाणी उपचारपद्धती

परमपूज्य श्री माताजींनी सांगितल्याप्रमाणे, मीठ पाणी आपण रोज करावे. त्यामुळे आपल्या सूक्ष्म शक्ती केंद्रांचे शुद्धीकरण होते व आपली ध्यानातील गहनता वाढते. रात्री झोपण्या पूर्वी मीठ पाणी क्रिया अवश्य करावी. ते सर्वात उत्तम व परिणाम कारक असते.

मीठपाणी करण्याची पद्धत

१. एका टबमध्ये आपली पावले घोट्यापर्यंत बुडतील एवढे कोमट पाणी घ्या .(थंड पाणी वापरले तरी चालते).
२. पाण्यामध्ये एक ते दोन मुठी खडे मीठ टाका.
३. पाय पुसण्यासाठी कापड व पाय धुण्यासाठी मगमध्ये स्वच्छ पाणी घ्यावे.
४. आपण स्वतः खुर्चीवर बसून बंधन घ्या.
५. मग दोन्ही पाय टबमधील पाण्यामध्ये सोडा.
६. दोन्ही हात उघडे मांडीवर ठेवा व श्री माताजींच्या कुंकवाकडे पहा.
७. प्रार्थना करा की
श्री माताजी कृपा करून आमच्यातील सर्व निगेटिव्हिटी , चक्रातील बाधा या जलतत्त्वात निघून जाव्यात.
८. या स्थितीत आपण पाच ते दहा मिनिटे बसू शकतो.
९. एकेक पाय स्वच्छ पाण्याने धुऊन व कापडाने पुसून घ्या.
१०. टब मधील पाणी संडासात टाका.
११. त्यानंतर पाच ते दहा मिनिटे ध्यान करा.

 ही क्रिया करत असताना श्रीमताजींसमोर दिवा लावलेला असावा. या क्रियेमध्ये आपण पंचतत्त्वांचा वापर शुद्धीसाठी करत असतो. (दिवा म्हणजे अग्नी तत्त्व , पाणी म्हणजे जलतत्त्व, आकाश तत्त्व आपल्या सभोवताली असते, वायुतत्त्व आपल्या सभोवताली असते, व पाण्यातील मीठ म्हणजे पृथ्वी तत्त्व असते)

मीठ पाणी प्रक्रियेचा उपयोग आपल्या चक्रातील अडथळे , शरीरातील वेदना, बाधा दूर करण्यासाठी होतो.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058