भव सागर

मुख्यपृष्ठ | भव सागर

देवता: श्री आदि गुरू
नियंत्रण:  पचन
गुण: धर्म, संतुलन, स्थैर्य, व्यक्तिमत्त्व
संबंधित दिवस: गुरुवार
संबंधित रंग: हिरवा
संबंधित तत्त्व: अग्नी व जल
हातावरील स्थान: हाताच्या बोटांच्या 
खाली व तळव्याच्या मधल्या भागाच्या 
भोवताली
दोषांची कारणे: धर्मवेडेपणा, स्वप्नाळूपणा, 
काळी जादू, अगुरू, अविद्या.

आदिगुरूंचे अवतार
राजा जनक इ.पू १०००० ते १६००० भारत
अब्राहम इ.पू. २००० मेसोपोथमीया
मोझेस इ. पू. १३०० इजिप्त
झारातरुष्ट्र इ.पू. १००० परशिया
लाओत्से इ.पू.६४० चीन
कन्फ्यूशियस इ.पू. ५५१ ४६९ चीन
सॉक्रेटिस इ.पू. ४६९ ग्रीस
मोहम्मद इ. ५७० मक्का
नानक इ. १४६९ भारत
साईनाथ इ. १८५६ भारत

प्रास्ताविक

अज्ञान आणि भ्रांती याचे निराकरण व्हावे लागते आणि या भ्रांतीतून वास्तवात येण्यासाठी, जिथे संघर्ष होत असतो, तो भाग आहे भवसागर.

गुण

भवसागर हे आपल्या गुरुतत्त्वाचे स्थान आहे. जसे हे स्थान कुंडलिनी प्रकाशित करते, तसे आपण आपले स्वतःचे गुरू होतो. या गुरुत्वामुळे आपल्याला स्थिरता मिळून संतुलनात राहायला मदत होते. कुंडलिनीने वर चढून ही पोकळी भरल्यावर, चित्तातील गोंधळ आणि भ्रांतीतून आपण बाहेर येऊन सत्याच्या जाणिवेकडे प्रवास होतो. अशाप्रकारे आपण, बाह्यतील कशावरही अवलंबून न राहता, आपल्या स्वतःच्या उत्क्रांतीचे नियंत्रण करू शकतो. शेवटी आपल्या चैतन्यलहरी आपल्याला ध्यानात सर्व उत्तरे व युक्त्या देतील. असंख्य प्रसंगात, बाह्यातून आपल्या अडचणींवर मार्ग आपल्या समोर येतील पण ते ओळखण्याची युक्ती आपल्याजवळ हवी. 

परंतु जसे स्वतःचे गुरू होत जातो तसे सत्य आणि कल्पना, योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक समजण्याची क्षमता विकसित होते. आपल्यातील गुरुतत्त्व बिघडल्यास चैतन्यलहरी ते लगेच दाखवतील. शिवाय आपली पचन यंत्रणा बिघडल्यामुळे आपल्याला ते समजेल. उदाहरणार्थ मळमळणे किंवा इतर संवेदना पोटातून येतील. एखादी अधार्मिक कृती आपण पाहिली किंवा आपल्या शारीरिक किंवा सूक्ष्म यंत्रणांचा गैरवापर, उपयोग केल्यास त्याचा परिणाम भावसागरातील संवेदनांमुळे आपल्याला ओळखता येईल.

देवता

श्री आदि गुरुदत्तात्रेय येथील प्रमुख अधिष्ठात्री देवता असून त्यांच्या दहा अवतारांचे ही इथे वास्तव्य असते.

भवसागराची स्वच्छता

तत्त्वांचा उपयोग

  • मीठ घातलेल्या कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवून बसणे
  • ज्योतीचा उपयोग

प्रार्थना

  • श्री माताजी, मी माझा स्वतःचा गुरू आहे.
  • श्री माताजी आपणच माझ्या गुरु आहात.

सामान्य सूचना

  • स्वतःला शिस्त लावणे.
  • आत्मपरीक्षण करून स्वतःच्या आचरणात व विचारात बदल करणे.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058