नाभी चक्र

मुख्यपृष्ठ | नाभी चक्र

मध्य नाभी
देवता
: श्री विष्णू व लक्ष्मी
स्थूल स्वरूप: सीलियाक प्लेक्सस
कार्य: जठर, आतडी यांच्या कार्याचे नियंत्रण
गुण: समाधान, मनःशांती, औदार्य, सदाचरण (धर्म) व उत्क्रांती
पाकळ्यांची संख्या: दहा
संबंधित दिवस: गुरुवार
संबंधित रंग: हिरवा
संबंधित ग्रह: गुरू
संबंधित तत्त् : जल
संबंधित खडा: पाचू
हातावरील स्थान: मधले बोट
दोषांची कारणे: कंजूषपणा, उपवास, मद्यपान, अमली पदार्थ, चिकित्सकपणा, धार्मिकतेचा/ कर्मकांडांचा अतिरेक, अव्यवस्थितपणा, खाण्याचा अतिरेक

डावी नाभी
देवता: गृहलक्ष्मी
कार्य: प्लिहा व स्वादुपिंड यांच्या कार्याचे नियंत्रण
गुण: पत्नीचे स्थान, आदर्श गृहिणी
हातावरील स्थान: डाव्या हाताचे मधले बोट
दोषांची कारणे: कौटुंबिक समस्या, अडचणी ,पती-पत्नी यांच्यात एकाचे दुसऱ्यावर प्रभुत्व, सततच्या घाई गडबडीमुळे मनावरील ताण, आर्थिक चिंता

उजवी नाभी
देवता: राजलक्ष्मी
कार्य: यकृताच्या कार्याचे नियंत्रण
हातावरील स्थान: उजव्या हाताचे मधले बोट
दोषाची कारणे: यकृतासाठी अयोग्य आहार, हट्टीपणा

प्रास्ताविक

नाभी चक्रात उत्क्रांतीचा तो टप्पा दिसून येतो, जेव्हा त्याला समाधान मिळू लागते. हेच समाधान, आत्मसाक्षात्कारानंतर जीवनातील सर्व स्तरांवरच आपण अनुभवू लागतो.

गुण

समाधानी स्वभाव हा या चक्राचा मूलभूत गुण आहे. उष्ण यकृताचे लोक चिडचिड्या स्वभावाचे असतात. त्यांच्याबाबतीत चिंता विरहीत जीवन अशक्य असते. लहान लहान गोष्टीवरून सुद्धा त्यांच्या मूड जातो. आत्मसाक्षात्कारानंतर नियमित ध्यानाने आत्म्याच्या प्रकाशात परिस्थितीची यथार्थ कल्पना येत असल्याने आपण क्वचितच चिंतित होतो. निर्विचारितेत मनःशांती मिळते आणि आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी असतो. निरर्थक बाह्य गोष्टीत आपले लक्ष जात नाही. आपले तिकडे लक्ष जात नाही. आरामदायी व शोभून दिसणारे, प्रसंगानुरुप असणारे पारंपारिक पद्धतीचे कपडे अधिक पसंत केले जातात. नाभी चक्रासाठी म्हणावे मी आत्मा आहे आणि समाधानी आहे.

आध्यात्मिक प्रगती समाधानी स्वभावावर अवलंबून असते . समाधान मोकळे मन व औदार्य यांच्यावर अवलंबून असते. आपल्याजवळ जे आहे त्याच्यात इतरांना सहभागी केल्याचा मानसिक फायदा होतो (समाधान मिळते)आणि नाभी चक्र सुद्धा भौतिक स्वरूपात लाभ देते. आत्मसाक्षात्कार मिळाल्यावर नियमित ध्यानाने परमेश्वर आपली काळजी घेतोय अशी आपली दृढ श्रद्धा तयार होते आणि आपली कर्तव्य व जबाबदाऱ्या आपण आनंदाने पार पाडतो. त्याच्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. कुटुंबातील प्रत्येकाला परस्परांबद्दल प्रेम व आदर वाटतो व एकत्र राहून सगळ्यांचा उत्कर्ष व्हावा अशी भावना असते.

नाभी चक्राचा आणखी एक महत्त्वाचा गुण आहे सदाचरण म्हणजे धर्म. आंतरिक समाधानाला बाहेरच्या वागण्यातील सदाचरण व समाधान यांची जोड मिळणे आवश्यक असते. त्याच्यासाठी सदाचारी असण्याचे महत्त्व व फायदे लक्षात ठेवायला हवे. आत्मसाक्षात्कार नियमित ध्यानाने जसा प्रस्थापित व विकसित होईल तसेच सदाचरण व समाधान आतूनच येतात.

सोने कधी कलंकित होत नाही असा धर्म कधी बदलत नाही. धार्मिकतेत सापेक्षता नसते, म्हणजे एखादी कृती सदाचरणाप्रमाणे योग्य आहे किंवा नाही एवढेच असते. सहजयोगात, नियमित ध्यान केल्याने,आपल्या चैतन्य लहरी च आपली कृती योग्य आहे , की अयोग्य आहे हे दर्शवतात.त्यानुसार स्वतःत आपोआप सुधारणा केली जाते. हा सहज योगाचा फार मोठा फायदा आहे.

देवता

श्री विष्णू आणि लक्ष्मी नाभी चक्राच्या अधिष्ठात्री देवता आहेत. श्रीविष्णू हे सृष्टीचे प्रतिपालक आहेत. ते धर्माचे रक्षण करतात आणि आपली उत्क्रांती घडवतात. नाभी चक्राच्या सशक्ततेसाठी डाव्या बाजूची देवता गृहलक्ष्मीचे स्थान सांभाळणे गरजेचे असते. त्याच्यासाठी पत्नीला प्रेम व सन्मान देणे आवश्यक असते. पत्नीने कुटुंबातील गृहलक्ष्मीचे सद्गुण व महत्त्व लक्षात घेऊन ते आचरणात आणायला हवे. त्याच्यामुळे ती आदरणीय होते. श्री लक्ष्मी तत्त्वाची आठ अंगे असून लक्ष्मी त्याच्या पैकी एक आहे. श्री लक्ष्मी तत्त्वाची जागृती व विकास नियमित ध्यानाने होतो.

स्थूल शारीरिक कार्य

हे चक्र जठर व त्याच्या सभोवतालच्या यंत्रणेच्या कार्याचे नियंत्रण करते. जठराचे कार्य बिघडल्यास अन्नाच्या पचनावर परिणाम होतो. म्हणून जठराचे जास्त महत्त्व आहे. अन्नासंबंधी आपली प्रवृत्ती आणि आपण कसे अन्नाचे सेवन करतो याचा पाचक रस व ग्रंथी यांच्यावर परिणाम होतो. अन्नाचं सेवन करताना आपण गडबडीत असलो किंवा चिडले असलो किंवा चिंताग्रस्त असलो तर त्याचे व्यवस्थित पचन होणार नाही कारण त्या मनस्थितीत जठराचे स्नायू ताठरल्यामुळे पचनाच्या क्रियेचे काम व्यवस्थित करू शकत नाहीत. आपले जेवण संतुलित असावे व आनंदाने त्याचे सेवन करावे. त्याच्यामुळे सहजपणे अन्न जठरात जाऊन पाचक रसांमुळे खाल्लेल्या अन्नावर व्यवस्थित प्रक्रिया होते. चांगल्या पोषणासाठी शांतपणे अन्नसेवन करणे अत्यंत गरजेचे आहे.

नाभी चक्र बिघडण्याची कारणे

नाभी चक्र अनेक कारणांनी कमकुवत होते. घरगुती कौटुंबिक त्रास, अडी अडचणी आर्थिक विवंचना यांच्यामुळे या चक्राच्या डाव्या बाजूवर दोष येतो. खादाडपणा किंवा उपवास, खाण्याचा सतत विचार करण्याने हे चक्र बिघडते.

मध्य नाभी चक्राची स्वच्छता

तत्त्वांचा उपयोग

 • नाभीच्या भोवताली मेणबत्तीचा उपयोग फारच लाभदायक असतो.
 • मीठ घातलेल्या गरम पाण्यात पाय ठेवून ध्यान करणे.
 • थोडावेळ दीर्घ व सावकाश श्वासोच्छ्वास करावा.

प्रार्थना

 • श्री माताजी, मी आत्मा आहे व समाधानी आहे.

सामान्य सूचना

 • नाभी चक्राच्या पुढच्या व पाठीकडच्या भागांना चैतन्यलहरी द्याव्या.
 • चैतन्यलहरी मिश्रित पाणी प्यावे.
 • गुडघे व हाताचे कोपरे यांना मसाज करावा.

डाव्या नाभी चक्राची स्वच्छता

तत्त्वांचा उपयोग

 • मेणबत्ती ट्रीटमेंट (पोटाच्या डाव्या बाजूस)
 • मीठ घातलेल्या कोमट पाण्यात पाय ठेवून ध्यान करणे.

प्रार्थना

 • श्री माताजी, कृपा करून मला औदार्य द्या.

सामान्य सूचना

 • डाव्या नाभी चक्रास व्हायब्रेशन्स देणे.
 • आर्थिक व्यवस्थापनात सुधारणा करणे, आपल्याला जे मिळाले आहे, त्याच्यात समाधानी राहून सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे. स्वभावात औदार्य ठेवणे. पती पत्नी यांनी परस्परांबद्दल आदर व प्रेम याची भावना ठेवणे.
 • चैतन्य लहरी दिलेल्या मीठाचा उपयोग.

उजव्या नाभी चक्राची स्वच्छता

तत्त्वांचा उपयोग

 • मीठ घातलेल्या थंड पाण्यात पाय ठेवून ध्यान करणे.

सामान्य सूचना

 • दुग्धजन्य, तिखट ,तेलकट मसाले इत्यादी पदार्थांचा उपयोग कमी करणे.
 • यकृत थंड करणाऱ्या पदार्थांचा उपयोग वाढणे. उदाहरणार्थ उसाचा रस, आले, ताज्या भाज्या व फळे चैतन्य लहरी मिश्रित साखर यकृताला आईस पेक ने शेकणे.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058