चक्र आणि नाड्या

मुख्यपृष्ठ | चक्र आणि नाड्या

सूक्ष्म यंत्रणा

डाव्या बाजूची नाडी

डाव्या बाजूच्या नाडीला इडा नाडी, चंद्रनाडी अशी नावे असून डावी सिपंथेटिक हे त्याचे स्थूल स्वरुप आहे. या नाडीची मूलाधार चक्रात सुरुवात होते व डाव्या बाजूने वरचे बाजूस जाऊन आज्ञाचक्र क्रॉस करून मेंदूच्या उजव्या बाजूकडे प्रतिअहंकार तयार करते. इडा नाडी आपल्या इच्छाशक्तीची वाहक असते आणि आपल्या मानसिक कार्याला शक्ती देते. इच्छेमुळे आपल्याला भावना उद्भवतात. भावना म्हणजे वास्तविक अपूर्ण राहिलेल्या इच्छा. या इच्छा आणि त्यांच्याबरोबरच्या संवेदना डाव्या बाजूतून जिथे त्या पूर्ण होऊ शकतील अशा शरीरातील स्थानात जातात. कृती करण्यासाठी इच्छा आवश्यक असतात. इच्छेच्या प्रभावाशिवाय कृती करण्यास कारण मिळत नाही.

 डाव्या बाजूच्या समस्येमुळे माणसाच्या वागण्यात निष्क्रियता अथवा अतिशय भावनाप्रधानता या प्रवृत्ती असतात. त्याच्यामुळे खुशी आणि नैराश्य यांच्यात तो अडकला जातो. त्याला वाईट सवयी लवकर लागू शकतात. मग मनोनिग्रह, स्वयंशिस्त वगैरे अशक्य झाल्याने वाईट सवयी, व्य सने सोडणे जमत नाही. आळशीपणा वाढतो. शारीरिक व मानसिक सुखासीनते च्या बाहेर येणे त्याला जमत नाही.

उजव्या बाजूची नाडी

उजव्या बाजूच्या नाडीला पिंगला नाडी, सूर्यनाडी अशी योगात नावे आहेत. उजवी सिंपथॅटिक हे या नाडीचे स्थूल स्वरुप आहे. ही नाडी स्वाधिष्ठान चक्रातून सुरु होऊन ती उजव्या
बाजूने वर जाते आणि आज्ञा चक्र क्रॉस करून मेंदूच्या डाव्या बाजूला इगो (अहंकार) निर्माण करते. ही नाडी आपल्यातील क्रियाशक्तीची वाहक आहे. आपल्या बौद्धिक व शारीरिक कार्याला ही शक्ती देते. अधिक कार्यरत राहिल्याने या शक्तीचा जास्त व्यय होऊन डावी बाजू कमकुवत होते. त्यामुळे आत्म्याचा आनंद मिळविण्याची इच्छा कमी कमी होत जाते. उजवी बाजू प्रभावी झाल्याने व्यक्तिमत्त्वात कोरडेपणा व आक्रमकता येते. 

मेंदूच्या डाव्या बाजूकडील अहंकार वाढत जातो आणि फुग्या प्रमाणे होऊन मध्यनाडीतील शक्तीचा प्रवाह थांबतो. संपूर्ण यंत्रणा असंतुलित होते. अहंकाराच्या आंधळेपणाने भावनांच्या संवेदना अस्पष्ट होत जातात. दुसऱ्यांवर प्रभुत्व गाजवले जाते. अशा लोकांमध्ये उजव्या बाजूचे कार्य वाढत जाते. आक्रमकता व मानसिक तणाव सर्वच क्षेत्रात निर्माण होत असतात. त्याच्यामुळे व्यक्तीच्या बौद्धिक व भावनिक अगांमधील संतुलन बिघडते.

मधली नाडी

योगाच्या परिभाषेत मधल्या नाडीला मध्य मार्ग किंवा सुषुम्ना नाडी म्हणतात. या नाडीची सुरुवात कुंडलिनीचे स्थान (मूलाधार) येथून होऊन ती वरचे बाजूस मस्तकातील सहस्रारात जाते.

मधली नाडी आपल्यामधील स्वयंघटित होणाऱ्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक कार्यात समन्वय ठेवते. आपल्या हृदयाचे ठोके पडत असतात, फुफ्फुसे श्वासोच्छ्वास करतात, रक्तात प्लाझ्मा तयार होतो. मेंदू संपर्काचे केंद्रीकरण व समन्वय साधतो, शब्दाचे अर्थ समजून त्यांच्या प्रतिक्रिया देण्याचे काम मन करते. अशी व इतर पुष्कळ अविश्वसनीय कामे, आपोआप व सतत आपल्या नकळत, वर्षानुवर्ष होत असतात. आपले लक्ष दुसरीकडे असले तरीही कामे होत राहतात. आपण त्यांचे नियंत्रण करण्याचीआवश्यकता नसते. तरीसुद्धा आपल्या शरीरातील स्वयं घटित होणाऱ्या कामासाठी गुंतागुंतीची संपर्क यंत्रणा अत्यंत सुसंघटितपणे व नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत असते. पॅरासिपंथेटिक नर्व्हससिस्टिम सुषुम्नानाडीचे स्थूल स्वरूप असून सुषुम्ना नाडीच्या शक्तीवर तिचे कार्य चालते. हिचे सर्व कार्य स्वयं घटित, आपल्या कोणत्याही सहभागाशिवाय होते. तसेच कुंडलिनीचे उत्थापनही आपोआप होते. तसेच तिचे सर्व कार्य ही आपोआप होते. 

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058