घरी ध्यान करण्याची पद्धत

मुख्यपृष्ठ | घरी ध्यान करण्याची पद्धत

आपण नियमितपणे रोज सकाळी व सायंकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करणे आवश्यक आहे .परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या फोटोसमोर ध्यानात बसावे. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी या साक्षात आदिशक्तीच्या आई स्वरूपातील अवतार आहेत. हा सर्व सहज योग त्यांना ध्यानातून प्राप्त झालेला अनुभव आहे. आत्तापर्यंत अत्यंत अवघड समजला जाणारा कुंडलिनी योग जनसामान्यांसाठी श्री माताजींनी अतिशय सहज , सोप्या स्वरूपात शिकवला आहे. ज्याप्रमाणे बी जमिनीमध्ये रुजून आलेल्या छोट्याशा कोंबाला नित्यनियमा ने खत व पाणी आवश्यक असते , त्याच प्रमाणे एकदा जागृती झाल्यावर ,जागृत झालेली शक्ती सहस्रारात टिकवण्यासाठी रोज ध्यान करण्याची आवश्यकता असते. त्यामधूनच प्रत्येकाची वैयक्तिक प्रगती होत असते. यासाठी नित्यनियमाने १० ते १५ मिनिटे ध्यान करावे. आपणास दिलेल्या श्री माताजी निर्मला देवी यांच्या फोटोची प्रतिष्ठा राखली पाहिजे .फोटो व्यवस्थित फ्रेम करूनच ध्यानासाठी ठेवावा .काळ्या रंगाची फ्रेम करू नये ,कारण काळ्या रंगामध्ये वातावरणातील सूक्ष्म दोष खेचून घेतले जातात .फोटो चांगल्या पवित्र ठिकाणी ठेवण्यात यावा. तो भिंतीवर टांगू नये. आपण ध्यानात खाली जमिनीवर बसले असताना ,आपल्या नजरेसमोर दिसेल असा चांगल्या आसनावर फोटो ठेवावा.

फोटो समोर सकाळ-संध्याकाळ तेल वातीचा दिवा किंवा मेणबत्ती लावावी. तसेच उदबत्ती सुद्धा लावावी. फोटो दररोज स्वच्छ कापडा वर गुलबपणी शिपडुन फोटो पुसवा.परमपूज्य श्री. माताजींच्या कपाळावर व दोन्ही हातांच्या तळव्यांवर गुलबपणी मिश्रित कुंकू लावावे.कुंकू लावतांना उजव्या हाताच्या करंगळी जवळच्या बोटाने लावावे. फोटोसाठी लावण्यात येणार कुंकू वेगळेच ठेवावे. स्वतःची कुंडलिनी बांधून घ्यावी व बंधने घ्यावीत.

उजवा हाथ हृदयावर ठेऊन म्हणायचे आहे: 
श्री माताजी आपल्या कृपेत मी शुद्ध आत्मा आहे.

उजवा हाथ कपाळावर दाबून धरणे आणि डोके किंचित पुढे झुकवून म्हणायचे: 
श्री माताजी मी सर्वांना हृदयापासून क्षमा केली आहे.

उजवा हात डोक्याच्या मागे ठेवावा व डोके किंचित मागे झुकवून म्हणायचे आहे: 
श्री माताजी काळात नकळत मी काही चुका केल्या असतील तर मला क्षमा करा.

उजव्या हाताची बोटे ताणून तळव्याचा मधला भाग टाळूवर दाबून ठेवायचा. टाळूची त्वचा घड्याळाच्या दिशेने सात वेळा फिरवावी व सात वेळा म्हणायचे आहे: 
श्री माताजी कृपावंत होऊन मला आत्मसाक्षात्कार द्यावा.

वरील क्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात मांडीवर उताणे ठेवावे. काही वेळ शांतपणे विचारांना प्रतिक्रिया न करता ध्यानात बसावे यावेळी टाळूवरील अथवा तळहातांवरील संवेदनांच्या जाणिवेकडे लक्ष ठेवावे.थोडावेळ ध्यान झाल्यावर सावकाश डोळे उघडून कोणताही विचार न करता श्री माताजींच्या फोटोकडे पाहावे.

पुढील प्रमाणे आपण दुसऱ्याला जागृती देऊ शकतो

एका निवांत जागी ,स्वच्छ स्थानावर श्री माताजींचा फोटो आदरपूर्वक ठेवावा. मग दोन्ही हातांचे तळवे मांडीवर उताणे ठेवून आरामात डोळे मिटून बसावे. प्रथम विचार करणे थांबवावे. मग उद्भवणाऱ्या विचारांना न दाबता, त्यांच्याकडे त्रयस्थपणे पहावे. कोणताही शारीरिक किंवा बौद्धिक प्रयत्न करण्याची गरज नाही. सहजयोगाची स्वाभाविक क्रिया घटित होऊ द्यावी. खाली दिलेल्या पद्धतीमुळे , प्रार्थनेमुळे, शुद्ध इच्छा जागृत होऊन कुंडलिनी शक्तीच्या उत्थानाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

श्री माताजी म्हणतात, स्वतःच्या उत्क्रांतीच्या अवस्थेत जाणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक ते सर्व आपल्यामध्ये बसवलेले आहे. पण ही स्थिती मिळवण्याची आपली इच्छा असणे गरजेचे आहे. हे कोणावरही लादता येत नाही.

श्री माताजींच्या फोटो समोर दोन्ही हाताचे तळवे मांडीवर उताणे ठेवून आरामात बसावे व खाली सांगितल्याप्रमाणे क्रिया करावी

इडा पिंगला नाड्या यांमधील संतुलन
 • डावा हात उताणा ठेवून उजवा हात जमिनीवर पालथा ठेवणे. खुर्चीवर बसणाऱ्यानी उजवा हात जमिनीच्या बाजूस खाली सोडावा व खाली दिलेली प्रार्थना म्हणावी..
  "श्री माताजी आपल्या परम कृपेने माझ्या डाव्या बाजूकडील तमोगुणांचे सर्व दोष भूमी तत्त्वात विलीन होऊ देत".
 • उजवा हात मांडीवर उताणा ठेवून, डावा हात कोपरात वाकवून व तळवा कानाच्या बाजूस उघडा राहील असा उभा धरावा व खालील प्रार्थना म्हणावी. "श्री माताजी आपल्या परम कृपेने माझ्या उजव्या बाजूकडील रजोगुणाचे सर्व दोष आकाशतत्त्वात विलीन होऊ देत.'
  यामुळे इडा व पिंगला नाड्या संतुलनात येतात.
 • उजवा हात हृदयावर ठेवून खालील प्रश्न तीन वेळा विचारावा" श्री माताजी मी आत्माआहे का?"
 • उजवा हात कपाळावर आडवा ठेवून कपाळाच्या दोन्ही बाजू किंचित दाबाव्यात व खालील प्रार्थना दोन वेळा किंवा कपाळावर हलकेपणा जाणवेपर्यंत म्हणावी.
  "श्री माताजी, मी सर्वांना हृदयापासून क्षमा केली आहे"
 • उजव्या हाताची बोटे ताणून हाताच्या तळव्याचा मधला भाग टाळूवर ठेवावा.

मग दाब देऊन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने टाळूची त्वचा फिरवावी. सात वेळा खालील प्रार्थना करावी...
"श्री माताजी कृपा करून मला आत्मसाक्षात्कार द्यावा".

वरील क्रिया पूर्ण झाल्यावर दोन्ही हात मांडीवर उताणे ठेवावे. काहीवेळ कोणताही विचार न करता शांतपणे ध्यान करावे. यावेळी टाळूवरील अथवा हातावरील संवेदनांच्या जाणिवेकडे लक्ष द्यावे. थोडा वेळ ध्यान झाल्यावर सावकाश कोणताही विचार न करता श्री माताजींच्या फोटोकडे पहावे. दोन्ही तळ हातांवर, टाळूवर थंड वाऱ्याची जाणीव होते व निर्विचारीता येते.

श्री माताजी म्हणतात, फुलाचे फळ होते तसे तुम्ही घटित होता. ते तुमच्यातच आहे, त्याला कार्यान्वित होऊ द्यायचे असते.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058