आज्ञा चक्र

मुख्यपृष्ठ | आज्ञा चक्र

मध्य आज्ञा
देवता: यशू ख्रिस्त (माता मेरी)
स्थूल स्वरूप: आँप्टीक थँलँमसच्या छेदन रेषेवर (पिट्यूटरी व पिनियल ग्लँडस्)
नियंत्रण: दृष्टी, श्रवण, विचार करणे
गुण: क्षमाशीलता, पुनरुत्थान, नम्रता, कारुण्य
पाकळ्यांची संख्या: दोन
संबंधित दिवस: रविवार
संबंधित रंग: पांढरा
संबंधित ग्रह: सूर्य
संबंधित तत्व: प्रकाश
संबंधित खडा: हिरा (डायमंड)
हातावरील स्थान: अनामिका
दोषांची कारणे:
अस्थिर दृष्टी, क्षमाशीलतेचा अभाव, कुसंगती

डावी आज्ञा
देवता: श्री महावीर
नियंत्रण: स्मृती, संस्कार, सवयी
गुणधर्म: प्रतिअहंकार
स्थूल स्वरूप: कपाळाची उजवी बाजू डोक्याच्या मागच्या बाजूपर्यंत
हातावरील स्थान: डाव्या हाताची अनामिका
दोषांची कारणे
स्वतःला त्रास करून घेणे, स्वतःस कमी लेखणे, एखाद्याला क्षमा करण्यास असमर्थ, भूतकाळात राहणे

उजवी आज्ञा
देवता: श्री बुद्ध
नियंत्रण: 'मी'पणाची भावना
गुणधर्म: अहंकार
स्थूल स्वरूप: कपाळाची डावी बाजू डोक्याच्या मागच्या बाजूपर्यंत
हातावरील स्थान: उजव्या हाताची अनामिका
दोषांची कारणे
ईश्वराबद्दल चुकीच्या कल्पना, इतरांना त्रास देणे, काळजी करणे, आक्रमक, अहंकारी, भविष्यवादी

प्रास्ताविक

आज्ञा चक्र मेंदूच्या मध्यभागी असून मानवी उत्क्रांतीची सहावी अवस्था दर्शवते.

कपाळाच्या मध्यावरून हे स्थान लक्षात येते. हे सहस्त्रार चक्राचे प्रवेशद्वार आहे आणि मनात अशुद्धता असल्यास ते कुंडलिनीला सहस्रारात चढू देत नाही. कुंडलिनी या चक्रामधून जाते तेव्हा दोन विचारांमधील अंतर रुंदावते. अंतर असते शांती. चक्रांच्या पाकळ्या उघडतात तसे मध्यभागी शांती उमलते आणि केंद्रापासून सभोवताली बाहेरच्या बाजूकडे पसरत जाऊन विचारांना जाणिवेच्या कडेपर्यंत ढकलते. या स्थितीत जाणिवेची निर्विचारीता घटित होते. या अवस्थेत आपल्याला अतिसुंदर शांतीचा निस्तब्धतेचा अनुभव येतो जे सृजनाचे ह्रदय असते.

गुण

क्षमाशीलता हा आज्ञा चक्राचा प्राथमिक गुण आहे. उत्क्रांतीच्या या क्षणी माणसाने प्रगत समाज विकसित केला, पण या प्रगतीबरोबर प्रश्न उद्भवला अहंकाराचा - माणसाला वाटू लागले की एक मीच कर्ता आहे. वाढत्या वयात आई-वडील, मित्र, सभोवतालचे वातावरण यांच्यामुळे माणसावर जे संस्कार होतात, ते प्रतिअहंकार निर्माण करतात. अशाप्रकारे अहंकार व प्रतिअहंकार माणसाला आत्म्यापासून वेगळे करतात.

देवता

डाव्या आज्ञेचे श्री महावीर अधिष्ठात्री देवता असून त्यांचे स्थान डोक्याच्या उजव्या भागात आहे. स्वतः व इतरांबद्दलची अहिंसा हा त्यांचा उपदेश होता. तो फार सूक्ष्म होता की मनात हिंसक विचारांना थारा दिला नाही तर मनाच्या सौम्यपणाने प्रतिअहंकार शांत होतो.

श्री बुद्ध उजव्या आज्ञा चक्राची अधिष्ठात्री देवता असून त्यांचे स्थान डोक्याच्या डाव्या भागात आहे. अहिंसा आणि कारुण्य यांच्या संदेशाचा त्यांनी प्रसार केला. आठ अंगांच्या साधनेचा आणि मध्यमवर्गात राहण्याचा त्यांनी उपदेश केला.

सहस्त्रारात जाण्यापूर्वी कुंडलिनी मध्य आज्ञा चक्रातून वर जाते. मध्य आज्ञाचक्र हे श्री येशू ख्रिस्त व मेरीमाता यांचे स्थान आहे. क्षमा करण्याच्या शक्तीने त्यांनी मानवाचा उद्धार केला. हृदयापासून क्षमा मागितली तर ती केली जाते. अहंकार व प्रतिअहंकार यांच्या पलीकडे गेल्यावर आपण भूतकाळातल्या कृत्याच्या पलीकडे जातो.

आज्ञा चक्राची स्वच्छता

डाव्या आज्ञाचक्राचे स्वच्छता

तत्वांचा उपयोग

 • फोटोमधील श्री माताजींच्या आज्ञा चक्राकडे पहावे.
 • डोक्याच्या मागच्या बाजूला ज्योतीचा उपयोग करावा.

प्रार्थना

 • श्री माताजी, कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल आपण मला क्षमा करावी.

सामान्य सूचना

 • डावा हात श्री माताजींच्या फोटोचे बाजूस करून उजव्या हाताने डोक्याच्या मागच्या भागाला चैतन्यलहरी द्याव्या.
 • त्रास असल्यास कापुराच्या ज्योतीने मागचे आज्ञाचक्र स्वच्छ करता येईल.
 • सारख्या जुन्या आठवणी काढल्याने सुपर इगो वाढू शकतो म्हणून जुन्या आठवणी यांच्यात रमू नये.

उजव्या आज्ञाचक्राची स्वच्छता

तत्वांचा उपयोग

 • श्री माताजींच्या फोटोमधील आज्ञा चक्राकडे पाहणे

प्रार्थना

 • श्री माताजी, आपल्या कृपेत मी सर्वांना, मला स्वतःला सुद्धा क्षमा केली आहे.
 • श्री माताजी, आपल्या सर्व करणाऱ्या आहात. मी काहीच करत नाही.

सामान्य सूचना

 • डावा हात श्री माताजींच्या फोटोचे बाजूस करून उजव्या हाताने कपाळाला चैतन्यलहरी द्याव्यात.
 • आज्ञा चक्राशी संबंधित ध्यानाच्या पद्धती उदाहरणार्थ चित्त एकाग्र करणे, दृष्टी समोर काहीतरी आणणे, संमोहन वगैरे यांचे आचरण थांबवावे.
 • वर्तमानात राहणे. भविष्याचा विचार करणे थांबवावे.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058