अनाहत चक्र

मुख्यपृष्ठ | अनाहत चक्र

मध्य हृदय
देवता: श्री जगदंबा
स्थूल स्वरूप: कार्डियाक प्लेक्सस, 
स्टर्नम बोन (छातीच्या मध्यभागातील अस्थी)
नियंत्रण: श्वसन, स्तन, इम्यून सिस्टीम (
रोगप्रतिकारक यंत्रणा), रक्तातील 
अँटीबॉडीजची निर्मिती व पोषण
गुण: सुरक्षितपणाची भावना, 
आत्मविश्वास, धाडसीपणा, 
मातृत्वाबद्दल आदर
पाकळ्यांची संख्या: बारा
संबंधित दिवस: शुक्रवार
संबंधित रंग: गुलाबी जांभळा
संबंधित ग्रह: शुक्र
संबंधित तत्त्व: वायू
संबंधित खडा: रुबी (माणिक)
हातावरील स्थान: करंगळी (दोन्ही हातांची)
दोषाची कारणे: भीती, बेजबाबदारपणा,
 जास्त जबाबदारी घेणे.

डावे हृदय
देवता: श्री शिव पार्वती
स्थूल स्वरूप: डावे कार्डियाक प्लेक्सस
नियंत्रण: हृदय
गुण: अस्तित्व, जीवन , आनंद, आत्मसाक्षात्कारानंतर सच्चिदानंद.
हातावरील स्थान: डाव्या हाताची करंगळी
दोषाची कारणे: शारीरिक व भौतिक कार्याचा अतिरेक, अमली पदार्थांचा उपयोग, नास्तिक पणा, ईश्वरविरोधी काम

उजवे हृदय
देवता: श्रीराम
स्थूल स्वरूप: उजवे कार्डियाक ल्पेक्सस
गुण: पिता, पती, बंधू, पुत्र यांच्याप्रती कर्तव्यदक्ष जीवन, दयाळूपणा, मर्यादा पालनात जागरुकता
हातावरील स्थान: उजव्या हाताची करंगळी
दोषांची कारणे: बिघडलेले संबंध, भावनिक आक्रमण, उद्धटपणा अविचारीपणा, क्रोध

प्रास्ताविक

जन्म झाल्यावर मुलाचा पहिला प्रतिसाद असतो त्याच्या आईच्या आत्म्याला. जन्माच्या क्षणी त्याला स्वतःच्या किंवा त्याच्या आईच्या शरीराचे भान नसते .पण आत्म्याची जाणीव असते. हे मूल शुद्ध आत्मा असते आणि या शुद्ध आत्म्याला आईच्या आत्म्यात आराम व आधार मिळतो. त्याच आधारावर ते मूल त्या नवीन अपरिचित वातावरणात टिकून राहते. हा प्रतिसाद म्हणजे शुद्ध निर्व्याज प्रेम असते. हेच निर्व्याज प्रेम हा ह्रदय चक्राचा गुण आहे. शुद्ध प्रेम निरासक्त असते.,(जसा एखादा वृक्ष सगळ्यांना निर्हेतुकपणे छाया देत असतो.)

गुण

डावे ह्रुदय चक्र आत्म्याचे घर असते. आपले आत्मतत्त्व जागृत झाल्यावर आपल्यात प्रेमशक्ती निर्माण होते. आत्मसाक्षात्कारानंतर आपले शरीर, मन, भावना इत्यादींशी तादात्म्य सुटू लागते. मधले ह्रुदय चक्राने आत्मविश्वास, धीटपणा वगैरे गुण मिळतात. काही कारणाने असुरक्षित वाटल्यास स्टर्नम अस्थी व्हायब्रेट होऊन शरीरातील इम्यून सिस्टिम व इतर यंत्रणा कार्यरत होऊन प्रतिकारासाठी सज्ज होतात. आत्मविश्वास येतो. स्थूल प्रकारच्या इच्छा व बाह्यातील नकारात्मक गोष्टींचा प्रभाव यांच्यापासून आपले रक्षण होते. मर्यादा व कर्तव्य यांची जाणीव झाल्याने,नातेसंबंध सुधारतात.

देवता

सहस्त्रारातील केंद्रस्थानात, ब्रह्मरंध्रात आत्म्याचे पीठ असते. या ठिकाणी गौरी स्वरूपा कुंडलिनीचे श्री शिवांशी मिलन होते. डाव्या ह्रुदय चक्रात आत्मा श्री शिव प्रतिबिंबित असून त्यांच्या या रुपात तेथे राहण्यावर आपले जगणे अवलंबून असते. म्हणून या चक्राचे महत्त्व समजणे व त्याचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे. मध्य हृदयात जगन्माता जगदंबा यांचे वास्तव्य असते. मातृत्त्वावरील श्रद्धेमुळे आपल्यात सुरक्षितपणा येतो. श्री रामाचे उजव्या हृदयात स्थान आहे. त्यांनी पिता, पुत्र, पत्नी व राजा या भूमिकेतून जीवनाचा आदर्श प्रस्थापित केला, सदाचरणी धार्मिक जीवन त्यांच्यातील मर्यादांच्या पालनाचे एक उदाहरण घालून दिले की ज्याच्यात सद्सद्विवेकाची शक्ती दिसून येते आणि ज्याचे अनुकरण आध्यात्मिक उन्नतीस पोषक असते.

ह्रुदय चक्राची स्वच्छता

मधल्या ह्रुदय चक्राची स्वच्छता

तत्त्वांचा उपयोग

 • हृदयाच्या भागाभोवती मेणबत्तीचा उपयोग करणे जास्त परिणामकारक ठरते.
 • दीर्घ श्वास घेऊन, काही क्षण ठेवून , सोडणे. असे तीन ते चार वेळा करावे. एकीकडे मनात जगदंब जगदंब असे म्हणता येईल.

प्रार्थना

 • श्री माताजी कृपा करून मला निर्भय व्यक्ती बनवा.

सामान्य सूचना

 • हृदयाच्या पुढील आणि मागील बाजूस चैतन्य देणे.

डाव्या हृदय चक्राची स्वच्छता

तत्त्वांचा उपयोग

 • हृदयाच्या भागाभोवती मेणबत्तीचा उपयोग करणे जास्त परिणामकारक ठरते.

प्रार्थना

 • श्री माताजी मी आत्मा आहे.
 • श्री माताजी, मी मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, चित्त नाही, मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे.
 • श्री माताजी कृपा करून माझ्या ह्रूदयात राहावे. श्री शिवाची क्षमा मागणे.

सामान्य सूचना

 • डाव्या हृदय चक्रास व्हायब्रेशन्स देणे.
 • हृदयस्थ आत्म्यावर चित्त स्थिर करणे.
 • अतिशय शारीरिक व बौद्धिक कार्याने, ताण-तणावामुळे डाव्या ह्रुदय चक्रात दोष आल्यास उजवी बाजू संतुलनात आणावी व डाव्या हृदयास व्हायब्रेशन्स द्यावे.

उजव्या ह्रुदय चक्राची स्वच्छता

तत्त्वांचा उपयोग

 • वायू तत्त्वाचा उपयोग करणे.

सामान्य सूचना

 • उजव्या ह्रुदय चक्रास व्हायब्रेशन्स देणे.
 • कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात चांगल्या वागणुकीच्या मर्यादा वाढवा.
 • पिता व पती यांच्याप्रती गुणांमध्ये व सुरक्षिततेविषयी गुण विकसित करा.

टोल फ्री नंबर

1800 30 700 800

आमचा पत्ता

एच एच श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट,
चांदणी चौक, एनडीए रोड,
विठ्ठल नगर, वारजे, पुणे,
महाराष्ट्र 411058